Description

चिंतामणी आय पॉलिक्लिनिक/हॉस्पिटल हे धर्मभक्ती अपार्टमेंट,मधुर स्वीट च्या बाजूला,रिलायन्स पेट्रोल पंप जवळ,मेरी, पंचवटी नाशिक येथील मेडिकल फील्ड मधील एक विश्वासार्ह हॉस्पिटल आहे . येथे सर्व प्रकारच्या डोळ्यांच्या संबधी आरोग्यसुविधा जसे दृष्टीदोष, लघुदृष्टी चे आजार,दीर्घदृष्टी आजार ,मोतीबिंदू (Cataract) उपचार व शस्त्रक्रिया ,काचबिंदू (Glaucoma) उपचार ,तिरळेपणा, नेत्रपटलाचे आजार (Retinal disease), डायबेटिक रेटीनापथी (Diabetic retinopathy), आळशी डोळा (Amblyopia), रातांधळेपणा (Night Blindness), डोळयाला पाझर / सतत पाणी येणे आजार (Dacrocystitis), डोळ्यांना अपघाताने झालेली इजा या सर्व प्रकारच्या नेत्र रोगांवरती योग्य निदान व उपचारअतिशय माफक दारात पुरविल्या जातात . या हॉस्पिटल मधील उच्चशिक्षित डॉक्टर्स आपल्याला रोगाच्या अचूक निदांना सोबत त्यावरील सुयोग्य उपचार करण्यात सदैव तत्पर असतात, तसेच रुग्णांना योग्य व चांगल्या प्रकारची रुग्णसेवा देण्यास प्रयत्नशील असतात. हॉस्पिटल हे रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या सर्व काही अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे ज्यामुळे रुग्णांना अतिशय चांगल्या प्रकारचा उपचार मिळू शकेल . येथील डॉक्टर्स,नर्सेस व हॉस्पिटल मधिलमधील इतर कर्मचारीवृंद रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना सहकार्य करण्यात नेहमी अग्रेसर असतात.सदरील हॉस्पिटल आपल्याला रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या अचूक रोगनिदान व त्यावरील योग्य उपचार , हॉस्पिटल मधील सुखसोई व सुरक्षितता यासाठी कटिबद्ध आहे.

Specialist Available

  • Ophthalmologist

Features

  • Eye Checkup - General
  • Eye Screening/ Treatment
  • Cataract Services
  • Diabetic Eye Checkup
  • Dry Eye - Evaluation / Treatment
  • Glaucoma Services

Timing

Day Timing
Monday 5:00 PM to 7:00 PM
Tuesday 5:00 PM to 7:00 PM
Wednesday 5:00 PM to 7:00 PM
Thursday 5:00 PM to 7:00 PM
Friday 5:00 PM to 7:00 PM
Saturday 5:00 PM to 7:00 PM

Packages

Name Price Description
cataract मोतीबिंदू शस्त्रक्रिया 20000 14000
30 % Off
Medicine - No
Room Type - Semi-Special
मोतीबिंदू म्हणजे काय ? डोळ्यातील नैसर्गिक पारदर्शक भिंग अपारदर्शक झाल्यास त्याला मोतीबिंदू असं म्हणतात. पूर्णपणे पिकलेल्या अवस्थेत तो मोत्यासारखा दिसतो. म्हणून त्याला मोतीबिंदू हे नाव पडलंय. पण कधीकधी तो गडद तपकिरी किंवा काळ्या रंगाचाही असू शकतो. अपारदर्शक झालेल्या या भिंगामुळे प्रकाशकिरण डोळ्याच्या आतील दृष्टीपटलापर्यंत पोहचू शकत नाही आणि अशा प्रकारे दृष्टी मंदावते. जगात सर्वात जास्त व्यक्तींना मोतीबिंदूमुळे अंधत्व येतं. मोतीबिंदूवरील उपचार आज आधुनिक विज्ञानाने केवळ २ ते ३ मिमी किंवा त्यापेक्षा ही कमी आकाराच्या आणि आपोआप बंद होणाऱ्या छेदातून बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणं शक्य झालंय. अगदी अलीकडच्या काळात तर कोणत्याही प्रकारचे शस्त्र न वापरता केवळ लेसर किरणांच्या साहायाने बुबुळावर सुक्ष्म छेद करुन आणि मोतीबिंदूचे विखंडन करणं शक्य झाल्यामुळे भविष्यातील मोतीबिंदू शस्त्रक्रिया अधिकच सुटसुटीत होणार आहे. कृत्रिम भिंगरोपण डोळ्यातील मोतीबिंदू काढल्यानंतर त्या जागेवर कृत्रिम भिंगरोपण करणं गरजेचं असतं. कृत्रिम भिंगरोपणामुळे जवळजवळ नैसर्गिक नजर प्राप्त होण्यास मदत होते. कृत्रिम भिंग उपलब्ध होण्यापूर्वी शस्त्रक्रियेनंतर रुग्णास नजर येण्यासाठी जाड भिंगाचा (उदा. +१०, +१२) चष्मा वापरावा लागत असे. कृत्रिम भिंग उपलब्ध झाल्यामुळे जाड भिंगाच्या चष्मा वापरण्यापासून रुग्णांची सुटका झाली. कृत्रिम भिंगाचा शोध लागल्यानंतर तो अधिकाधिक उपयुक्त होण्यासाठी त्यावर गेली अनेक वर्षं सातत्याने प्रयोग होत आहेत. आजच्या आधुनिक युगात अतिशय लवचिक अशा पदार्थापासून लेन्स बनवले जात असल्यामुळे त्यांची घडी करता येते किंवा दुमडले (फोल्डेबल लेन्स) जाऊ शकतात. त्यामुळे २ ते ३ मि.मी. किंवा त्यापेक्षाही कमी आकाराच्या आपोआप बंद होणाऱ्या छेदातून भिंगरोपण करणं शक्य झालंय. सातत्याने सुरु असलेल्या या संशोधनामुळे वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या कार्यप्रणालीचे, वेगवेगळ्या हेतूने बनवलले कृत्रिम भिंग आज उपलब्ध आहेत. उदा. मोनोफोकल, मल्टीफोकल, अॅकोमोडेटिव्ह, टोरीक आदी. रुग्णांच्या अपेक्षा, गरज, रुग्णांच्या डोळ्यांची रचना, उपलब्ध यंत्रसामुग्री आणि वर नमूद केलेल्या भिंगाचे फायदे आणि तोटे या सर्व गोष्टींचा विचार करुन कृत्रिम भिंगरोपणाचा निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे प्रत्येक रुग्णाने मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या डोळ्यात कोणती लेन्स (भिंग) बसवणं योग्य राहिल या संबंधित आपल्या नेत्रतज्ज्ञाकडे जाऊन चर्चा करावी. बिनटाक्याच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे फायदे मोतीबिंदूच्या कोणत्याही अवस्थेत ही शस्त्रक्रिया करता येते. सूक्ष्म छेद असल्यामुळे आणि टाके नसल्यामुळे जंतूसंसर्ग होण्याची संभावना अतिशय कमी असते. या शस्त्रक्रियेनंतर लांबच्या नंबरचा चष्मा लागण्याचं प्रमाण ‌अतिशय कमी असतं. दहा ते पंधरा मिनिटांच्या कालावधीत शस्त्रक्रिया पूर्ण होऊन त्यानंतर रुग्णास लगेचच घरी जाता येतं. टाके नसल्यामुळे शस्त्रक्रियेनंतर डोळ्यात खुपणं, डोळा लाल होणं आणि डोळ्यातून पाणी येण्याचं प्रमाण खूप कमी असतं.•गरज पडल्यास किंवा आवश्यकता असल्यास कोणत्याही प्रकारचे भूलीचे इंजेक्शन न देता देखील ही शस्त्रक्रिया करता येते. शस्त्रक्रियेची किमंत हि वापरण्यात येणाऱ्या लेन्स नुसार बदलत जाते. प्रत्येक रुग्णाने नेत्ररोग तज्ज्ञांशी सल्ला घेऊन आपल्या गरजे प्रमाणे लेन्स निवडावी. आमच्या हॉस्पिटल ला यापुढील चांगल्या प्रकारच्या लेन्स देखील उपलब्ध आहेत. अधिक माहिती साठी आपण पॅकेज इन्क्वायरी सेंड करा अथवा अप्लिकेशन मध्ये पहिल्या पेज वरती wattsup वरतून आम्हाला मॅसेज करा. म्हणजे आम्ही आपणास पुढे मदत करू शकतो. डिस्काउंट मिळविण्यासाठी आधी पॅकेज इन्क्वायरी पाठवल्यास अथवा wattsup ला आम्हाला मॅसेज केल्यास आम्ही तुमची डॉक्टरांना भेटीची वेळ आपल्या व डॉक्टरांच्या सोई नुसार ठरवून देऊ शकतो. नियम अति लागू*.
Lasik Eye Procedure चष्म्याचा नंबर घालवण्यासाठी 70000 44000
37 % Off
Medicine - No
Room Type - Semi-Special
Lasik Eye Procedure चष्म्याचा नंबर घालवण्यासाठी जर आय बॉल (संपूर्ण डोळा) जो गोलाकार आकारात असतो, त्याच्या आकारात एका मिलीमीटरने फरक पडला, तरी देखील डोळ्यांच्या पडद्यावर प्रकाशाची किरणे योग्य पद्धतीने पोहोचत नाही. त्यामुळे अस्पष्ट दिसू लागते. आय-बॉल लांबला असेल (इलॉन्गेट) तर त्यास मायोफिया म्हणतात; त्यामुळे दूरचा चष्मा लागतो. आय-बॉल छोटा अथवा दबला असेल तर हायपरमेट्रोपिया असे म्हणतात; त्यामुळे जवळचे दिसण्यास अडचण येते. या शस्त्रक्रियेत लेजरद्वारे कॉर्नियाचा आकार बदलवितात. जेणेकरून प्रकाश किरणे योग्य प्रकारे फोकस होऊन, रॅटिनावर परिपूर्ण अशी प्रतिमा निर्माण होते आणि स्पष्ट दिसू लागते. सोप्या भाषेत सांगायचे तर आपण लेजरद्वारे कॉर्नियाच्या आकाराला ‘रिमॉडेल’ करतो. या शस्त्रक्रियेत कॉर्नियाला छोटा चिरा देऊन झडप (फ्लॅप) तयार करतात. त्या झडपेच्या खाली असलेल्या कॉर्नियाच्या भागाला लेजरद्वारे जाळून पूर्वीपेक्षा सपाट करतात. त्यामुळे फोकस करण्याची क्षमता वाढते व दूरवरचे दिसू लागते. ही शस्त्रक्रिया वयाच्या अठराव्या वयानंतर किंवा नंबर स्थिर झाल्यावर करावी. त्यासाठी डोळे निरोगी असले पाहिजे. अधिक माहिती साठी खालील view detail बटन वरती क्लीक करा पुढे आपण आपल्या आवडी प्रमाणे कुठल्याही एका हॉस्पिटल ची आपण पॅकेज इन्क्वायरी सेंड करा अथवा अप्लिकेशन मध्ये पहिल्या पेज वरती wattsup वरतून आम्हाला मॅसेज करा. म्हणजे आम्ही आपणास पुढे मदत करू शकतो. डिस्काउंट मिळविण्यासाठी आधी पॅकेज इन्क्वायरी पाठवल्यास अथवा wattsup ला आम्हाला मॅसेज केल्यास आम्ही तुमची डॉक्टरांना भेटीची वेळ आपल्या व डॉक्टरांच्या सोई नुसार ठरवून देऊ शकतो. नियम अति लागू*.

Insurance

Location